ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निश्चल ताकसांडेची नवोदयसाठी निवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा – भवन्स लॉयडस विद्या निकेतन, वर्धा येथील पाचवीतील विद्यार्थी निश्चल विश्वास ताकसांडे याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत वर्धा जिल्ह्यातून अकरावे स्थान मिळविले. निश्चलची २०२६-२७;या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालय सेलू (काटे) येथे निवड झाली आहे.
त्याने आपल्या यशाचे श्रेय वडील विश्वास ताकसांडे, आई रतीश्री ताकसांडे, आजी -आजोबा, यांच्यासह पूजा बकाले मॅडम यांना दिले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.



