चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : सेलू नागपूर महामार्गावरील जंगलापुर नजिक मजुरांना घेऊन जाणारा टँक्टर पलटी झाल्याने झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमी आहे ही घटना रविवारी ता 22 ला दुपारी एक वाजता चे दरम्यान घडली.
सेलूकडून नागपूर कडे विजवितरण कंपनीचे साहित्य घेऊन जाणारा टँक्टर क्रमांक एम एच 32 पी 1999 हा जंगलापुर नजिक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला यात बसलेले आठ मजूर हे जखमी झाले टँक्टरमध्ये इलेक्ट्रिक पोल असल्याने पाच जण गंभीर जखमी झाले जखमीमध्ये राहुल बागडी वय 18,निर्मल बागडी वय 21राणी बागडी वय17,बलराम बागडी वय 17,अमित बागडी वय 21 सर्व राहणार कोलकता यांचा समावेश आहे ,या घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या रुग्णवाहिकेने जखमीला सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले



