भुरकुंडा बु. श्रीगुरुदेव सेवा मंडळाने केली संत गाडगेबाबा जयंती साजरी
तालुका प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा :- तालुक्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळ भुरकुंडा बुज.च्या वतीने हनुमान मंदिर येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यकमाचे अध्यक्षस्थानी राजुरा तालुका प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पुंडलिक सुर्तेकर,शामराव सोनुले, लक्ष्मन चौधरी सचिव, पत्रुजी शेंडे तबलावादक,सौ.वनिता ढोले महिलाप्रमुख, मिराबाई सोनूले सेवाधिकारी, पोचू निकोडे,मधूकर सोनुले,मारोती देवेकर,नागू सोनुले, मारोती आदे, अभय सोनुले,भास्कर वाडगुरे,पुंडलिक सुर्तेकर, राईबाई निकोडे, कुसूम सोनुले,शंकर वाडगुरे,तबलावादक तिरुपती मेश्राम आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी नुकतेच गोयेगाव मंडल-केरामेरी जि. आसिफाबाद येथे यशस्वीपणे संपन्न झालेले २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात सहभागी प्रतिनिधींना सन्मानपत्र वितरीत करुन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. कार्यकमाध्यक्ष राजुरा तालुका प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे यांनी संत गाडगेबाबा यांच्याबद्दल असा संत होणे नाही असे विचार व्यक्त करीत गाडगेबाबा चे जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे हे स्वतः कार्यकमाला उपस्थित झाले त्याबद्दल भुरकुंडा बुज जनतेने त्यांचे कौतुक केले.
यावेळी सुत्रसंचालन भास्कर वाडगुरे व आभारप्रदर्शन अभय सोनुले यांनी केले. कार्यकमास गावातील बहुसंख्य महिला व पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



