ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालय जिवती येथे मराठी अस्मितेचा महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ महाविद्यालय जिवती येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनांनिमित्त “मराठी अस्मितेचा महोत्सव” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवाने संपूर्ण परिसर मराठीमय केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी अभिमान गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजयकुमार देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख असल्याचे प्रतिपादन केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लांडगे, डॉ. अली, डॉ. दुर्योधन, डॉ. डोर्लीकर, प्रा. शिंदे, प्रा. रहाटे यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करून तिचा सन्मान वाढवावा, असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतातून केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यावर पाहुण्यांनी विशेष प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी काव्यवाचन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रत्येक सादरीकरणात मराठी प्रेमाची भावना प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मुंडे यांनी केले. “जय मराठी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये