ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे मराठी भाषा दिन उत्सव साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मराठी कवितागायन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच स्वरचित कविता सादरीकरण घेण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी, अभिव्यक्तीची संधी आणि सर्जनशीलतेला चालना मिळाली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिक्षकांनी एकत्रितपणे केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता व घोषवाक्यांमधून मराठी भाषेचे महत्त्व, अभिमान आणि संस्कृतीचे दर्शन घडले.

मराठी भाषा दिनाचा हा उत्सव शाळेत आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु मृणाला तुळशीराम कौरासे हिने केले तर कार्यक्रमाचे आभार स्वरा कल्लारे हिने मानले…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये