महात्मा गांधी विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय,गडचांदूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांनी आजच्या दिवशी दि.28/02/1928 ला लावलेल्या शोध रमण इफेक्ट या दिनानिमित्य राष्ट्रीय विज्ञान सर्वत्र साजरा केला जातो.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री विजय डाहुले, पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्की तसेच ज्येष्ठ शिक्षक जाधव, श्रीमती भारती घोंगे, पोगुलवार, हरिहर खरवडे,श्री प्रशांत धाबेकर मंचावर उपस्थित होते याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनपरिचय व त्यांच्या शोधाचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्याचे उत्तरे जाणून घेण्यात आली व विद्यार्थ्यांना याप्रसंगी बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.श्री प्रशांत धाबेकर यांनी विज्ञान दिवसाचे महत्व विशद केले . मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात विज्ञान किती महत्वाचे आहे हे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु समृद्धी बारसागडे व कु प्रणाली कदम व आभार प्रदर्शन कुमारी श्रेया मारटकर हिने केले.
यावेळी विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



