ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शास. औ. प्र. संस्थेत राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न

प्रत्येकांनी आपल्या जीवनात विज्ञान जगले पाहिजेत - प्रा. सुरेश चोपणे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 चंद्रपूर :_ ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध विज्ञान प्रसारक प्रा. सुरेश चोपणे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गटनिदेशक बंडोपंत बोढेकर होते तर रासेयो कार्यक्रम अधिकारी गटनिदेशक श्री. राजु श्रीरामे, निदेशक श्री. किशोर इरदंडे, कु. सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

  सुरूवातीला थोर शास्त्रज्ञ सि. व्ही . रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथींचा परिचय कु. सलोनी बोडणे यांनी करून दिला.

यावेळी प्रा. सुरेश चोपणे म्हणाले की, विज्ञानाशिवाय व्यक्ती आपले जीवन उत्तमपणे जगू शकत नाही. तेव्हा प्रत्येकांने जीवन जगण्याचे‌ विज्ञान शिकून घेतले पाहिजेत . ते समजून घेतले पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये विज्ञान उतरविले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विज्ञान आपल्याला अंधश्रद्धेपासून दूर नेऊन विचार करण्याची सवय लावते. प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे, ही सुध्दा विज्ञानाची देणगी आहे, असे श्री. बोढेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक श्री. किशोर इरदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक राजु श्रीरामे यांनी केले.‌ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार तसेच रासेयोच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये