ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे शिव जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे शिवजयंती निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी भूषविले तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की, जयंती समितीच्या प्रमुख नंदाताई भोयर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रा चेतना कामडी, नरसिंह पांचाळ, दिपाली पाचभाई, देवराव जाधव, प्रताप शेंडे, प्रा सुधीर थिपे, प्रा प्रदीप परसुटकर या शिक्षकांनी शिवाजी महाराजांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये