ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवजन्मोत्सवानिमित्त गडचांदूर येथे रासेयो स्वयंसेवकांची पदयात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती निमित्त शहरातून पदयात्रा काढण्यात आली.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहूले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की, उपस्थित होत्या
या पदयात्रेचे संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर यांनी केले तर या प्रसंगी प्रा. आरजू आगलावे ,प्रा. संगीता पुरी, प्रा. रीना लांडे, प्रा. सचिन भैसारे, प्रा. सुधीर थिपे, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. प्रताप शेंडे, प्रा. नितीन वाढई, विनोदभाऊ भोगेकर तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



