शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे आवश्यक _ घनशिराम शिपणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता घनशिराम शिपणे यांनी शिव जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे शिव जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव अहिरे, शांतीलाल निरफळे, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मधुकरराव शेळके, उपस्थित होते,
याप्रसंगी पंडितराव पाथरकर, रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे,अरुण सपाटे, प्रा विजय रायमल, कैलास गाडगे, घनश्याम भंडारे, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, बाबुलाल शिवरकर, सुशील हनुमंते, सूर्यभान पंडित, रमेश गवई, रामदास भोलनकर, आदी उपस्थित होते, याप्रसंगी विविध मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव.गोविंदराव बोरकर यांनी केले.



