ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरला उल्लेखनिय कामगिरीसाठी १४ पुरस्कार देवून गौरव

सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्कार संतोष तेलंग यांना देवून केले सन्मानित

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरला २०२२-२३ या वर्षासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी एकूण १४ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्कार संतोष तेलंग यांना देवून सन्मानीत करण्यात आले.
रोटरी क्लब ३०३०च्यावतीने वर्धा येथे गांधी सिटी रोटरी क्लबच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यातआलेहोते. या सोहळ्याला रोटरी क्लब ३०३०चे राज्यपाल आनंद झुनझुनवाला यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरलाएकूण१४ पुरस्कार देवूनगौरविण्यातआले.यामध्ये प्रामुख्याने जगभरातील लोकांच्या जीवनात रोटरीची कल्पना करण्यासाठी मदत केल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनलसायटेशन अवार्ड, उत्कृष्ट कुटुंब कल्याण पुरस्कार, नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेले सर्वोत्तम कार्यासाठी पुरस्कार, सर्वोत्तम युवा महिन्याचे उपक्रम राबविल्याबद्दल अवार्ड, शेगावयेथेझालेल्याजिल्हाकॉन्फरन्सला सर्वाधिक उपस्थिती दर्शविल्याबद्दल पुरस्कार, रोटरी फाउंडेशनसाठी सर्वोच्च योगदानासाठी अवार्ड, जिल्हा. मेंबरशिप ओरिएंटेशन सेमिनारमध्ये आदरातिथ्य आणि व्यवस्थापनासाठी कौतुक पुरस्कार, प्री पेट सिटहोस्टींगसाठी अवार्ड, समाजकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी जिल्हा टीआरएफ सुवर्ण प्रशस्तिपत्र, टीआरएफसाठी सर्व सदस्यांचे शंभर टक्के योगदानासाठी पुरस्कार तथा जिल्हा राज्यपालांच्या वतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार पीपी डॉ.विजय आईंचवार, पीपी, भालचंद्र उर्फ राम चांदे व राज्यपालांचा कौतूक पुरस्कार पीपी सचिन गांगरेड्डीवार,पीपी महेश उचके यांना देवून गौरविण्यात आले.जिल्हा राज्यपाल आनंद झुनझुनवाला यांच्यावतीने उत्कृष्ट सचिव पुरस्कार संतोष तेलंग यांना देवून गौरविण्यात आले. रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरला एकूण१४ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन साप्ताहिक बैठकीत पुष्पगुच्छ देवूनकरण्यातआले. वर्ष २०२२-२३ साठी पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष अजय जयस्वाल, सचिव संतोष तेलंग, सहसचिव विशाल खांडरे, कोषाध्यक्ष संजय ठवस तथा संपूर्ण टिमचे कौतूक करण्यातआले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये