जबरी चोरीचे अट्टल गुन्हेगार निष्पन्न
एकुण 42 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 07/02/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे विजेंद्र शंकरराव देशमुख वय 54 वर्ष रा. न्यू यशवंत नगर हिगणघाट जि. वर्धा यांनी तक्रार दिली कि ते दिनांक 06/02/2025 रोजी रात्री 21/00 वा. दरम्यान छोटी वनी येथे त्यांचा मोपेड गाडीने डेली कलेक्शन करता गेले होते तेथून महामार्गाने हिंगणघाट कडे येत असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वार यांनी मागून येऊन त्याची डेली कलेक्शन ची बॅग ज्यात नगदी 45000/- रु असलेली बॅग हिसकावून घेऊन हिंगणघाट कडे निघून गेले बॅग ओढल्यामुळे फिर्यादी गाडीने खाली पडले त्यामुळे डोक्याला व हाताला मार लागल्याने त्यांचे प्राथमिक उपचाराकरिता सरकारी दवाखाना येथे जाऊन उपचार केला. अश्या फिर्यादी यांचा तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्रमांक 158/2026. कलम 309 (4) 3(5) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांने केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत घटणास्थळी भेट देवुन सदरचा जबरी चोरी गुन्ह्या संबधाने गोपनीय व तांत्रिक माहीती घेऊन सदर जबरी चोरी ही भीम नगर वार्ड हिगणघाट येथे राहणारा प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे वय 19 वर्ष व बिडकर वार्ड हिंगणघाट येथे राहणारा रोहित गोदे यांनी केली असल्याचे निष्पन्न केले, आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे शोध घेत असता आरोपी प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे यास टाका ग्राउंड हिंगणघाट येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे संबंधाने विचारपूस केली असता आरोपी याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिल्यावरुन आरोपी प्रफुल उर्फ चांगा हरिदास चंदनखेडे वय 19 वर्षे राहणार भीम नगर वॉर्ड हिंगणघाट याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल नगदी व मोबाईल असा एकूण जुमला किंमत 42,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही – मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक, वर्धा, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि विजयसिंग गोमलाडू, पोउपनि प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप,पो. शि. विकास मुंडे,उदय सोलंकी सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन, मीना कौरती सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



