ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श कॉलनी येथे महादेव मंदिरात महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरातील आदर्श कॉलनी, येथे आज दि.६ फेब्रुवारी रोजी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर उभारणीचा व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगल वातावरणात पार पडला. वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक, आरती आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

    आदर्श कॉलनी येथे महादेव मंदिर उभारणीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत केलेल्या सहकार्यामुळे श्री महादेव मंदिर उभारणी व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा उपक्रम साकार झाला. सकाळपासूनच पूजाअर्चा, रुद्राभिषेक व विशेष धार्मिक विधी पार पडले.

प्राणप्रतिष्ठेनंतर उपस्थित भाविकांनी श्री विश्वेश्वर महादेवांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शांतता, सद्भावना आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव देणारा हा सोहळा आदर्श कॉलनीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला.

नव्या मंदिरामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा मिळेल, तसेच भाविकांसाठी नित्य पूजाअर्चेचे केंद्र म्हणून श्री विश्वेश्वर महादेव मंदिर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

       या सोहळ्याला आमदार मनोज कायदे यांनी भेट दिली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये