देशी, विदेशी दारु व बिअर कॅनची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांवर रेड
फोरव्हीलर गाडी व १६ पेटी देशी, विदेशी दारु व बिअर कॅनसह एकुण १२ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २२/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, समतानगर, सांवगी (मेघे), वर्धा येथे राहणारा मुकेश जयस्वाल, रा. कळंब जि. यवतमाळ हा त्याचे साथीदार नामे पारीकेत खडसे, रा. वर्षा हे त्यांचे जवळ असलेल्या पांढऱ्या रंगाची ईकांस्पोर्ट कार क. एमएच १२ एन. यु. ३१३३ मध्ये अवैधरीत्या देशी, विदेशी दारु व बिअर कॅन भरुन त्याची वाहतुक करुन विकी करीता घेवुन येत आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्धाचे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत सिध्दार्थनगर बोरगाव मेघे, वर्धा येथे नाकेबंदी करीत असतांना थोडया वेळात माहीती प्रमाणे पांढऱ्या रंगाची चारचाकी ईकांस्पोर्ट कार क. एमएच १२ एन. यु. ३१३३ गाडी येतांना दिसली असता पंचासमक्ष खाजगी वाहनाचे मदतीने सदर चारचाकी वाहन चांवण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडीचा चालक हा जागीच मिळून आला तसेच त्याचे सोबत बसुन असलेला ईसम हा पळून गेला. पंचासमक्ष गाडी चालकास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मुकेश राधेलालाजी जयस्वाल, वय ३९ वर्षे, रा. वार्ड क. ०३ गार्डन चौक कळंब ता. कळंब जि. यवतमाळ असे सांगितले तसेच पळुन गेलेल्या इसमाचे नाव २) पारीकेत खडसे रा. हनुमान नगर बोरगाव (मेघे) याचे मदतीने कळंब जि. अमरावती येथील राहणारा सदानंद शेडे याचे पासुन खरेदी करून आनल्याचे सांगितले, सदर वाहन ताब्यात घेवुन त्याची पाहणी केली असता वाहना मध्ये एकुण १६ खडर्याचे खोक्यात देशी, विदेशी दारू व विअर कॅन किंमत २,२३,२००/-रु. व पांढऱ्या रंगाची चारचाकी ईकांस्पोर्ट कार क. एमएच १२ एन. यु. ३१३३ किंमत १०,००,०००/- रु असा एकुण जु. किंमत १२,२३,२००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून गुन्हा नोद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी वालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरगे, अमर लाखे, भुषण निघोट, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सुमेध शेंद्रे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



