Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सुमठाणा येथील मोबाईल टॉवर उभारणीचे काम बंद करा

भीम आर्मीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती शहरानजिक असलेल्या महात्मा फुले नगर (नवीन सुमठाणा) येथील एका खाजगी भुखंडावर मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना भविष्यात त्रास होणार असून हे काम त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने गुरूवारी निवेदन सादर करत भद्रावतीच्या मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.

भद्रावती शहराच्या नजीक असलेल्या महात्मा फुले नगर येथे एका खाजगी भूखंडावर मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. या बांधकामाच्या परिसरात नागरी रहिवाशांची वसाहत असून परिसरातील अशोक नगर येथील नागरिकांनाही या टॉवरच्या रेडिएशन मुळे भविष्यात आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे. टॉवर उभारणीसाठी खोदण्यात आलेला खड्डा त्वरीत बुजविण्यात यावा तसेच खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवर साठी नगरपरिषदेने परवानगी नाकारून सदरचे बांधकाम त्वरित बंद करावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने नगराध्यक्षांना करण्यात आली आहे.

मोबाईल टॉवरचे काम बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे भद्रावती तालुका अध्यक्ष राजरतन पेटकर यांनी दिला आहे. यावेळी शहर अध्यक्ष थॉमस दुधे, सोनू सिंग, सचिन नारायने, सिद्धार्थ बुरचुंडे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये