आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

चांदा पब्लिक स्कूलचे संस्थापक श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

चांदा ब्लास्ट

आज दिनांक 20 जुलै 2023 ला चांदा पब्लिक स्कूल चे संस्थापक स्व. श्री संजय श्रीहरी जीवतोडे यांच्या स्मृतीदिनी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वाचन दिंडी काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तका सारखा एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करण्यासाठी प्रेरित व्हावे या उद्देशाने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नारे, घोषवाक्य, सुविचारांचे फलक इत्यादी द्वारा वाचनाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता…’ या गीता समवेत श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.

नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात पण स्वतःच्या कतृत्वाचा ठसा उमटवणारा एखादाच असतो. असेच चांदा पब्लिक स्कूल चे संस्थापक स्व. श्री संजय श्रीहरी जीवतोडे यांचे उदाहरण जगजाहीर आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात होणारे नवबदल लक्षात घेउन चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांची संधी प्राप्त करून दिली. त्यांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता संजय जीवतोडे अहोरात्र परिश्रम घेत आहे.

आपल्या शाळेचे संस्थापक श्री. संजय श्रीहरी जीवतोडे आमच्या साठी उच्च कोटीचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या आशिर्वादाची आम्हाला नेहमीच अनूभूती होत असते, असे व्यक्तव्य शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी केले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी सुद्धा श्री. संजय सरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वप्नाला पूर्णत्वाकडे घेउन जाण्याची प्रतीज्ञा घेतली.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख सौ. लता खनके, श्री. महेश गौरकार, सौ. मंजुषा गौरकार, सौ. स्मृती मुन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये