ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येरगव्हाण येथील कोतवालाने केली विष प्राशन करून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या येरगव्हाण येथील कोतवालाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

नंदलाल श्यामसुंदर कुळमेथे (३५) रा. येरगव्हाण असे मृतक कोतवालाचे नाव आहे. तो कोरपना तहसील कार्यालय अंतर्गत येरगव्हाण तलाठी साजा कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत होता. त्याला उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

सदर घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.त्याचे मागे पत्नी, आई वडील,एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये