Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लखमापूर येथे स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लखमापूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर यांच्या सौजन्याने युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रोशन भोयर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद क्षीरसागर सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर जोगी,वाचनालय सल्लागार रोशन भोयर, सहकारी शिक्षक अलावत सर, चव्हाण सर, शिक्षिका शोभना खैरे मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मनस्वी मडावी तर आभार रचना येटे हिने मानले.

स्पर्धेचे पर्यवेक्षण संदीप बावणे व कु. मंदा उरकुडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी समाधान वासाडे, प्रतीक पिंपळशेंडे, आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये