ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहरम उत्सव निमिती तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

भद्रावती शहरात जत्रेचे स्वरूप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील मोहरम बहुउद्देशिय उत्सव समिती सर्वधर्म समभाव तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा विविध कार्यक्रमाने गांधी चौक येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला शहरातील ताजे. पंजे. डोले ख्वाजा सवाऱ्या एकत्र आले होते याला जत्रेचे स्वरूप आले होते याच दिवशी संपूर्ण जगात मोहरम सण साजरा केला जातो हासेन – हुसैन करबला मध्ये शहीद झाले त्याचे स्मरण करण्यात आले कौमी – एकता. भाईचारा. अखंडता निर्माण व्हावी या देशात शांतता राहावी असे यातून संदेश देण्यात आला.

सर्वप्रथम मंच्यावर अनिल धानोरकर समितीचे संयोजक व अध्यक्ष नगर परिषद भद्रावती. बिपिन इंगळे ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती, अमोल तूळजेवार पी एस आय पोलीस स्टेशन भद्रावती. उमेश रामटेके समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू गैनवार समितीचे सचिव व माजी नगरसेवक. सुनील बिपटे व्हॉईस ऑफ इंडिया पदाधिकारी शेख रब्बानी समितीचे संघटक व सामाजिक कार्यकर्ते. निलेश पाटील नगरसेवक. इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाहुण्याचे पुष्प गूच्छ देऊन स्वागत करण्यात आले पाहुण्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

यात चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय दिवगत खासदार बाळू धानोरकर व मोहरम समितीचे कोष्याद्यक्ष व ज्वेलर असोशियनचे अध्यक्ष दिवगत प्रा विनोद घोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते यात शहरातील व्यापारी असोशियंन. ऑटो असोशियन. व इतर सामाजिक संघटने तर्फे लंगर. प्रसाद. शरबत. पिण्याचे पाणी वितरण करण्यात आले होते मोहरमचे दहा दिवस कार्यक्रम असतो व मोहरमच्या दहावीला याचे समारोप करण्यात आला पोलीस बंदोबस्त तगडा होता व भद्रावती येथील प्रशासकिय यंत्रणा सुध्दा सहयोग व सहभागी होते गांधी चौक येथे गेट. रोषणाई. पताका अशी सजावट केली होती ब्यांड, ढोल, ताश्याच्या गजरात कार्यक्रम झाला.

कार्यक्रम यशस्वी करणेकरिता शेख जावेद, सागर जट्टलवार, प्रशांत बदखल. मनोज बोरसरे, संजय सिडाम, शेख सलाम, राकेश कटारे, शेख खूरशिद. पिंटू मडावी, शेख ईसाक, जगन दानव इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये