वर्ध्यात शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुन्हेगारवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद नाही
नागरिकांनी व्यक्त केला संताप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4 ,5 दरम्यान वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका विकृत मानसिकतेच्या इसमाने नग्न अवस्थेत पुतळावर चढून विटंबना केल्याची घटना समोर आली आहे . या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. महापुरुषांच्या पुतळ्यांची वारंवार होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. “अशा घटनांना आळा कोण घालणार?” असा प्रश्न ही संतप्त नागरिकांनी शासन व प्रशासनाला केला आहे.
सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.



