ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 28 नोव्हेंबर पासून श्री गुरु चरित्र पारायण वाचन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री दत्त जयंती निमित्ताने भगवानबाबा नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान अखंड नाम जप, यज्ञ सप्ताह व सामुहिक श्री गुरु चरित्र पारायण वाचन सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे.
27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी करण्यात येणार आहे.28 नोव्हेंबर पासून सप्ताह सुरू होणार आहे.
गुरू चरित्र पारायण वाचन दररोज सकाळी 8ते 10 पर्यंत होईल. 5 डिसेंबर रोजी दुपारी सप्ताह ची सांगता महाप्रसाद ने केली जाणार आहे, तरी या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भगवानबाबा नगर, देऊळगाव राजा यांनी केले आहे.



