ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शासकीय कामाचे ठेके व नौकरीचे आमिष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     भद्रावती पोलिस स्टेशन येथे २२ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

नितीन वसंतराव मत्ते रा. खैरी (वडकी) ता. राळेगाव जिल्हा. यवतमाळ असे आरोपीचे नाव असून त्याने भद्रावती येथील प्रशांत राम पेटकुले वय.३६ रा. संताजी नगर भद्रावती यांना गोंडपिपरी जिल्हा. चंद्रपूर येथील रस्ता बांधकामाचे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने सात लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार ७ जाने.२०२१ ते जाने २०२२ दरम्यान ऑनलाईन रक्कम उकळली मात्र कामाचा ठेका मिळवून दिला नाही. तसेच नामे पल्लवी अजिंक्य देशपांडे यांना पंचायत समिती येथे नौकरी लाऊन देण्याच्या सबबीखाली २०२३ साली विविध तारखाना ऑनलाइन पद्धतीने पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता परत भद्रावती येथील ओंकार लेआऊट मधील दुर्गा विठ्ठल उमाटे यांचे मुलास आयुध निर्माणि चांदा येथे नौकरी लाऊन देण्याच्या सबबीखाली १६ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान १० लाख रुपये देण्यात आले. मात्र आरोपीने आयुध निर्माणि ऐवजी काटोल जिल्हा. नागपूर येथील अंध विद्यालयात नौकरी लागल्याबद्दलचे नियक्ती पत्र दिले मात्र सदर विद्यालय २०१७ पासून बंद असल्याचे निदर्शनात येताच आपली फसगत झाली हे कळले. वारंवार रक्कमेची मागणी करूनही सदर आरोपीकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दि.०७ मे २०२६ रोजी फिर्यादी प्रशांत राम पेटकुले यांच्या तक्रारीच्या आधारावर सबंधित आरोपी नामे नितीन वसंतराव मत्ते यांच्या विरोधात ४२० कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात उप निरीक्षक विरेंद्र केदारे व पथक करीत आहे.

सदर तपासाची सूत्रे एपीआय संजीव मिश्रा यांच्या कडे असून अद्याप सदर आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे कळते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये