ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुक्यातील भद्रावती ते चंदनखेडा रोडच्या कामात भ्रष्टाचार

भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते यांचा ठेकेदारांवर वरदहस्त - सुरज शहा आप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

            तालुक्यातील भद्रावती ते चंदनखेडा रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असुन या रस्त्याच्या बांधकामामध्ये आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष सुरज शहा यांना माहिती मिळाली की हे काम निष्कृष्ट दर्जेच सुरू आहे. सविस्तर कामाची पाहणी व माहिती घेण्यासाठी रस्ता बांधकामाचे ठिकाणी गेले असता असे दिसून आले की दोन दिवसा अगोदरच या रस्त्याचे काम करण्यात आले व आता तिथे बघता या रस्त्याचे डांबर व मुरूम निघण्याचे सुरू झाले आहे. हे सर्व बघता या रस्त्याच्या कामा मध्येभ्रष्टाचार होत असल्याचे दिसते. कारण पतल्या डांबर लेयरवर गिट्टची चादर सोडण्यात येत आहे. या सगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार दिसून येत आहे. यावर चौकशी करून माहिती घेतली असता की यात भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते यांचा ठेकेदारांवर वरदहस्त असल्याने हा सर्व गोरख धंदा सुरू आहे.

          दरवर्षी भद्रावती तालुक्यातील एकाच रस्त्याचे काम सतत होत आहे. याचे कारण भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते यांच्या कडून त्यांच्या 4 ते 5 चाहत्या ठेकेदारांनाच वरदहस्त असल्याने हे कामे त्या ठेकेदारांना देण्यात येत आहे. आजच्या ऑनलाइन च्या जमान्यात जिथं ऑनलाइन टेंडर भरल्या जाते तिथं सुद्धा जोड जंतर करून 0.99 आणि 0.55 या दरात below rate मधे चाहत्या ठेकेदारांना ठेका ( टेंडर ) मिळत आहे. यात प्रश्न पडतो की ठेकेदारांवर भद्रावती चे PWD उपअभियंता मत्ते यांचे संरक्षण तर नाही ? या बाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कुंभे यांना दिली असुन या विषयी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कठोर कारवाही करण्यात यावी या बाबत आम आदमी पार्टी कडुन निवेदन देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये