Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चिखली (बु ) येथे पेसा दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील ग्राम पंचायत चिखली (बू) येथे पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.२४ डिसेंबर २०२४ रोजी पेसा कायद्याला २८ वर्षे पूर्ण झाली.त्यामुळे केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने ग्रामपंचायती मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते.

या वेळी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभात फेरी काढण्यात आली.

यावेळी कायद्याच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.पेसा योजने अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व पेसा कायद्या बद्दल जनजागृती करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत चिखली (बु)चे सरपंच मनीषा वासुदेव गेडाम,उपसरपंच सत्तु जन्गु करपते,पंचायत अधिकारी प्रकाश के बोरकर,मुख्याध्यापक गेडाम,पेसा मोबिलासर वैशाली गेडाम,सदस्य जयश्री मडावी, चिनू कोटणके इतर सदस्य कॉम्पुटर ऑपरेटर लींगु करपते,ग्रामपंचायत शिपाई भिमराव मडावी दिवाकर मेश्राम व गावातील नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये