ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मौजे पिंपळनेर ते निमखेड कडे जाणारा जुना शेतरस्ता खुला करा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        येथील मौजे पिंपळनेर हद्दीतील पिंपळनेर पासून ते निमखेड – गिरोली कडे जाण्यासाठी जुना शेत रस्ता असून सदर रस्ता हा बंद झाला आहे. त्यामुळे येथील संबंधित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पिंपळनेर पासून ते वन विभागाच्या जमिनीपर्यंतचा शेत रस्ता तात्काळ खुला करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. रास्ता खुला न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी दिला आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे पिंपळनेर हद्दीत असणारा पिंपळनेर पासून ते गिरोली – निमखेड कडे जाणारा जुना शेत रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचा उपयोग त्या भागातील शेतांमध्ये व निमखेड गिरोली कडे जाण्यासाठी होत असे. मात्र मागील काही वर्षापासून संबंधित काही शेतकऱ्यांनी सदर रस्ता पूर्णतः बंद करून त्यावर शेत जमीन कसली आहे. परिणामी बाकीच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत रस्ता राहिला नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांना स्वतःची जमीन कसण्यासाठी व शेतमाल घरी आणण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने अडचणीचे ठरत आहे. पूर्वी या रस्त्याने बैलगाडी, जात असे. मात्र आता फक्त पाऊलवाटच राहिली आहे. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खते नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसेच शेतातील शेतमाल घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय आता फक्त पाऊलवाट असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतीमधील कामांसाठी आवश्यक साधनांची ने -आण करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करता येत नाही. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत रस्ता असता असणे खूप महत्त्वाचे आहे. याकरिता शासन देखील शेत रस्त्यासाठी आग्रही असते.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील मौजे पिंपळनेर हद्दीतील गिरोली निमखेड कडे जाणारा पिंपळनेर पासून ते वन विभागाच्या जमिनीपर्यंतचा जुना शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे,उपाध्यक्ष सुरेश कोल्हे,सचिव जहीर पठाण, अजमत खान,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, शंकर वाघमारे,मुबारक चाऊस,अमोल उदेपूरकर,संभाजी मुदमूल,जना मगर,बबन बुरकूल,सचिन कोल्हे, असलम खान,साजिद खान, विनायक अनपट, डॉ.संतोष पापडे, प्रल्हाद टकले,मधुकर सोनुने, सतीश रामाने, उद्धव सोनुने,आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये