Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे पो. स्टे आर्वी हद्दीत दारूबंदी कायद्यान्वाये रेड

6 लाख 13 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन:-आर्वी अप. क्र:- 1385 /2024 कलम 65(बी,सी,ई,एफ),83म.दा.का.  आरोपी नामे 1) रामेश्वर कचरूजी मेश्राम , वय 31 वर्ष, रा. सावळापूर ता.आर्वी जिल्हा वर्धा व इतर 3 घटनास्थळ:- जाम शिवार तळेगाव आर्वी रोड घटना.ता.वेळ:-* दि 19/12/2024 चे 14:30 वा. ते 17.40 वा. दाखल ता. वेळ:-दि. 19/12/2024 चे जप्त मुद्देमाल – 380 लिटर गावठी मोहा दारू, कच्चा मोहा सडवा 4000, उकळता मोहा सोडवा रसायन 280 लिटर, एकूण 25 ड्रम व इतर भट्टी साहित्य तसेच एक मोटर सायकल असा एकूण जुमला किंमत 6,13,300/- रु. चा मुद्देमाल थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे कि, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पो.स्टे. आर्वी हद्दीत मुखबीरचे खबरेवरून यातील नमुद आरोपीवर जाम शेतशिवार बंडवाल्यांच्या शेताशेजारी धाम नदीकाठी दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, नमूद आरोपी हा मोक्कावर रंगेहाथ गावठी मोहा दारूची हातभट्टी लावुन, मोहा दारूची निर्मीती करीत असतांना मिळुन आला तसेच घटनास्थळी गरम मोहा सडवा रसायण, कच्चा मोहा सडवा रसायण व गावठी मोहा दारूचा मुद्देमाल मिळुन आल्याने, त्यांना सखोल विचारपुस केली असता, कि, सदरचा मुद्देमाल हा त्यांचे स्वतःचे मालकिचा असल्याचे सांगितल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीला पुढील तपास कामी पोलीस स्टेशन आर्वी यांच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला माहितीस्तव सविनय सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये