Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री बालाजी संस्थान येथे कार्तिक उत्सवाची काणगी मोजणी संपन्न -22 लाख 34 हजार 37 रुपये कानगीचे उत्पन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

-श्री बालाजी महाराज कार्तिक उत्सव संपन्न झाला. लळीत होऊन कार्तिक उत्सवाची सांगता झाली दिनांक २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री बालाजी संस्थान येथे काणगी म्हणजे देणगी पंचा समक्ष मोजणी करण्यात आली दिनांक २४अक्टों ते २६ नोव्हेंबर पर्यंत कार्तिक उत्सव या कालावधीत एकूण २२ लाख ३४ हजार ३७ रुपये कानगी चे उत्पन्न झाले. मागील वर्षापेक्षा ३६ हजार ७५५ रुपये वाढीव कानगी प्राप्त झाली आहे.

या उत्सवात दीपोत्सव, जागरण गोंधळ,  फुलाची, अनुष्ठान, भक्तांचे अन्नदान संतर्पण, कार्यक्रम व लळीत होऊन उत्सवाची सांगता झाली. श्री बालाजी संस्थांन चे वंशपरंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यस्थापक किशोर बिडकर यांच्या मार्गदर्शनात उत्सवाचे कार्यक्रम पार पडले व सांगता झाली. श्री बालाजी संस्थान येथे कानगी मोजतांना उपस्थित असलेले पंचा मधे सरपंच वसंतराव कुलकर्णी, भगवानराव, अनील मल्लावत, श्रीपाद गोंदकर, मिलिंद पापडे, यांच्या समक्ष व व्यवस्थापक किशोर बीडकर, सहा व्यवस्थापक आशीष वैदय, हरिदास महाराज, प्रसिद्धी प्रमुख सुरज गुप्ता, ऋषिकेश भैय्ये, प्रथमेश पिंपळे श्री संस्थान चे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. व्यवस्थापक किशोर बिडकर यांनी सहकार्य करणारे मानकरी, सेवेकरी, पुजारी, ब्राह्मण वृंद, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, पोलीस विभाग, श्री बालाजी यात्रा उत्सव समिती, पत्रकार,भक्तगण, देणगीदार, अन्नदाते सर्वांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये