ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद

रहिवाशी परिसरात वन्यप्राणी, नागरिक भयभीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 गड्डमवार लेआउट परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू असतानाच दिनांक १७ रोजीच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने बिबट्या असल्याची पुष्टी झाली आहे.

वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पिंजरा लावला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भद्रावती शहरातील गड्डमवार लेआउट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू आहे. दिनांक १७ च्या रात्री परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत खबरदारीचा उपाय म्हणून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात बिबट्यासदृश पाऊलखुणाही आढळल्या आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर व पाळीव जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगरसेवक महेश जीवतोडे यांनीही नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

वन विभागाने स्पष्ट केले आहे की, बिबट्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली असून  सध्या वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये