आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैशाली धोटे चहांदे सेट परिक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट

कोरपना येथील दिवंगत नामदेवराव धोटे यांची लहान सुपुत्री वैशाली धोटे चहांदे हीने प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सेट परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले. महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2023 रोजी सेट परिक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत राज्यभरातून 101257 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 6676 विद्यार्थी पात्र झाले. या परीक्षेत वैशाली ने रसायन शास्त्र विषय घेऊन परिक्षा दिली. 27 जुन रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार वैशाली प्राध्यापक पदाकरिता पात्र ठरली आहे.
वैशाली ने आपले शालेय शिक्षण वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथीन तर पदवी अभ्यासक्रम गुरूनानक महाविद्यालय बामणी बल्लारपूर येथुन पूर्ण केले. रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व सायन्स महाविद्यालय चंद्रपूर येथुन पुर्ण केले. सध्या वैशाली गोंडवाना विधापीठातुन रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी पुर्ण करीत आहे. वैशाली सध्या डॉ आंबेडकर कला, वाणिज्य व सायन्स महाविद्यालयात तासिका प्रमाणे कार्य करीत आहे.
त्यानी आपल्या यशाचे श्रेय आई, सासु, सासरे, मामा, दादा, ताई, पती व डॉ आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक यांना दिले आहे. वैशाली या नवभारत- नवराष्ट्र चे कार्यालय प्रमुख प्रशांत चहांदे यांच्या पत्नी आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये