Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा समन्वयक पदी प्रमोद नागोसे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे आदेशानुसार युवा सेना सचिव किरण साली, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे, युवा सेना सचिव पूर्व विदर्भ शुभम नावले व कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती येथील माजी नगरसेवक प्रमोद नागोसे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे जिल्ह्यातील वरोरा व चिमूर या तालुक्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे‌. सदर नियुक्ती पक्षाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयात करण्यात आली.

यावेळी संदीप कुमरे, आकाश ढवस, मंगेश इखारे, स्वप्निल ढेंगळे, कार्तिक नेहारे, मंगेश पढाल,अक्षय मानकर, कुणाल पदीले,टिंकल नेहारे, सचिन डाहुले, अनिकेत नागोसे, सोमेश्वर परसे, अमित आगलावे, अमोल कोवे आदी उपस्थित होते. समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल नागोसे यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये