ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामपंचायत पळसगांव ता. बल्लारपुर येथे कायदेविषयक व तंबाकू प्रतिबंधक जनजागृती

व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्याचे उपस्थितांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

दि. 08 में 2024 रोज बुधवारला सकाळी 9.30 वाजता तालुका विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ संघ, बल्लारपुर यांचे संयुक्त विदयामाने ग्राम पंचायत पळसगांव ता. बल्लारपुर येथे कायदेविषयक व तंबाकू प्रतिबंधक जनजागृती कार्यकमाबाबतचा अहवाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे निर्देशान्वये तंबाकू विरोधी दिनानिमित्य तालुका विधी सेवा समिती बल्लारपुर, तालुका विधिज्ञ संघ बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने दि. 08 मे 2024 वेळ सकाळी 9-30 वाजता रोज बुधवारला ग्रामपंचायत पळसगांव ता. बल्लारपुर येथे कार्यकमाचे आयोजन करण्यांत आले.

सदर कार्यकमास अध्यक्ष म्हणून श्रीमती एस.एन. सावळेश्वरकर, दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, बल्लारपुर, तालुका वकील संघ अध्यक्ष अॅड आय.आर. सय्यद व पळसगाव चे सरपंच संगिता सोयाम, उपसरंपच नितीन वांढरे, व तंटामुक्ती समिती अध्यक्ष व्यंकटेश बुध्दलवार, ग्रा.पं. सदस्य महादेव शेवकर, व ईश्वर कोडापे व गावातील इतर नागरीक उपस्थित होते.

उपस्थित पाहुण्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आहे व नंतर कार्यकमाची सुरुवात करण्यात आली.

श्रीमती एस.एन. सावळेश्वरकर, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, बल्लारपुर यांनी आपल्या मार्गदर्शनात तंबाकू सेवन केल्याने काय दुष्परिणाम होतात याबाबत मार्गदशन केले व तंबाकू विरोधी दिनी मनात एक संकल्प घेवून कार्यकमांचा उददेश्य प्रतिसाद करावा तसेच प्रत्येकाने व्यसनविरहित जीवन जगण्याचे व व्यसनग्रस्त व्यक्तिनां विश्वासात घेवून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसेच अधिवक्ता श्री. एस. जी. हस्ते यांनी आपल्या मार्गदर्शनांत आजची युवा पिढी व्यसनांच्या आधीन गेलेली दिसून येते. प्रत्येक ठिकाणी तंबाकूचा सेवन भरमसाठ प्रमाणात होत आहे जे आरोग्याच्या दृष्टिने खूपच घातक आहे. त्यामुळे सर्वांना तंबाकू पासून दुर रहावे असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यकमाचे संचालन बी.एन. विधाते, अधिवक्ता व आभार प्रदर्शन आय.आर. सय्यद, अधिवक्ता यांनी उत्कृष्ठपणे केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे बी.एन. खनके अधिवक्ता सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस स्टेशन बल्लारपुर व कोठारी तसेच कार्यलयीन कर्मचारी वाय. पी. चिंतलवार,व.लि. कु.पी.टी.पेटकर, क.लि. म.पो.शि.अर्चना बोरसरे यांनी मोलाचा सहभाग दिला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये