ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय महामार्ग वर मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाहतुकीला अडथळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे, चिखली बायपास ते जालना बायपास रोड चे रुंदीकरण व सौंदर्यीकरण झाले आहे, त्यामूळे या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरु असते,या मार्गावर विविध चौकात मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे, काही ठिकाणी तर मोकाट जनावरांचा चौकात ठिय्या असतो, यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

बऱ्याचदा ही जनावरे अचानक वाहनासमोर येत असल्याने अपघात होत आहे. नगर परिषद ने या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई करावी, संबधित पशु मालकावर कारवाई करावी, व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये