गडचांदूर पतसंस्थेवर पुन्हा एकदा पुरोगामीचे वर्चस्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री मोरेश्वरजी बोंडे व ईतर पदाधिकारी यांनी दिलेल्या राजीनामामुळे आज पदाधिकारीची निवड करण्यात आली.अध्यक्ष म्हणून श्री.शंकर मेश्राम, उपाध्यक्ष श्री.काकासाहेब नागरे,सचिव श्री.विष्णू जाधव,खजिनदार राजश्री राठोड मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विरोधकांचे पुरोगामीच्या एकतेपुढे काहीच शिजले नाही म्हणून फार्म मागे घेत बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री अरविंद तडोसे व त्यांच्या टिमने काम पाहिले..पुरोगामीची एकता अभेद्य ठेवण्यासाठी सर्व जेष्ठ श्रेष्ठ शिलेदारांनी परिश्रम घेतले… नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे,जेष्ठ शिलेदारांचे,सर्व संचालकांचे आभार व्यक्त करतो व नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देवून यापुढे पुरोगामीचा नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही सर्व सोसायटी पदाधिकारी, संचालक एकजूटीने पुरोगामीचे वर्चस्व कायम ठेवू अशी ग्वाही देतो.असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती कोरपना चे अध्यक्ष पुंडलिक कौराशे यांनी सांगितले.