कुंभारी येथे गजानन महाराज पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कुंभारी येथील गजानन महाराज मंदीर येथे गजानन महाराज पारायण सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात आयोजन रविवारी करण्यात आले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्याताई पडवळ (राहणार ठाणे) यांच्या मुखोद्गत गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तगणांनी श्रवण केले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, फुलांची आरास, तसेच गजानन महाराजांचा देखावा अतिशय भाविकदृष्ट्या सजवण्यात आला होता. व्यासपीठावर विद्याताई पडवळ यांनी पारायणाच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला आणि पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांनी पारायण पुस्तिकेच्या साहाय्याने एकरूप होऊन सामूहिक ग्रंथपठनाचा अनुभव घेतला. पारायण सोहळ्यासाठी 951 भक्त बसले होते
कार्यक्रमादरम्यान सत्संग, प्रवचन श्रवण केले आणि भक्तांनी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने सहभाग घेत गजानन महाराजांच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त केली.हा पारायण सोहळा गावातील सर्व वयोगटातील लोकांसाठी अध्यात्मिक उर्जा आणि भक्तीचा अमूल्य अनुभव देणारा ठरला.
या पारायण सोहळ्याचे आयोजन अमोल बालाप्रसाद बंग यांनी केले. परिसरातील गजानन महाराज भक्त गण यांनी सहकार्य केले.