ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहर काँग्रेस कमिटी देऊळगाव राजाच्या वतीने 30 जुन रोजी जोडे मारो आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहर काँग्रेस पक्षाचे वतीने भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्या बद्दल अपमान जनक शब्द वापरून समस्त शेतकरी बांधवांना अपमानीत केले त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यासाठी तथा मा राज्यपाल साहेब यांना निवेदन देऊन उचित कार्यवाही करण्यात यावी यासाठी सोमवार दि ३०जून रोजी सकाळी ठिक १० वाजता बस स्टँड चौक देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष आतिश कासारे व तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये