ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माणिकगड सिमेंटच्या अग्निशमन दलाने मानोली गावाला आगीपासून वाचवले.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
मानोली गावाजवळील शेतात गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली.
गावातून फोन येताच माणिकगड, अल्ट्राटेक सिमेंटच्या अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणली.
गावच्या सरपंच अनुसया उदे , उपसरपंच गणेश नैताम व ग्रामस्थांनी माणिकगड कंपनीच्या अग्निशमन व सुरक्षा दलाचे मनापासून आभार मानले व सांगितले की, ही आग शेतातील सुकी लाकूड जळल्याने व दुपारची वेळ व कडक उन्हामुळे ती गावाकडे सरकू लागली, त्यानंतर गावातील लोकांच्या तत्परतेमुळे व माणिकगडच्या अग्निशमन दलाने त्वरीत आग आटोक्यात आणली.
त्यावेळी पोलीस पाटील प्रकाश चटप व सामूहिक वन हक्क समिती चे सचिव व सदस्य उपस्थित होते.