ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती २६ जुन रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवे क्षिका माधुरी मस्की मॅडम, एमसीवीसी विभागाच्या, प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा सुधीर थिपे यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये