जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त “सायकल ब्रेक करा, ऑर्गनाईज्ड क्राईम थांबवा” – प्राचार्य डॉ.नितीन मेहत्रे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय दे.राजा, पोलीस स्टेशन दे.राजा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन उप विभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, प्रभारी ठाणेदार आशिष रोही , प्राचार्य. डॉ. नितीन मेहेत्रे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य सचिन घुगे, बायर सेमिनिज् कंपनीचे रिजनल मार्केटिंग हेड शरद रामेकर , राहुल गुजांळ, गोपनीय अंमलदार समाधान बंगाळे, पोलीस शिपाई संतोष चेके, अमोल खारडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन मेहेत्रे यांनी “सायकल ब्रेक करा #ऑर्गनाईज्ड क्राईम थांबवा” ज्यामध्ये संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थाशी लढण्यासाठी दीर्घकालीन कृतीची आवश्यकता आहे असे सांगितले. प्रभारी ठाणेदार आशिष रोही यांनी अमली पदार्थ सेवनाने व्यक्ती हिंसक बनते हातून गुन्हे घडतात असे सांगितले. उप विभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी शाहू महाराज हे समतेचे आणि सामाजिक न्यायाचे खरे दूत होते असे सांगितले तसेच अमली पदार्थाने उच्च रक्तदाब पॅरालेसिस, कर्करोग व इतर गंभीर स्वरूपाचे आजार होतात. अतिमोबाईल वापरामुळे सुद्धा मनावर विपरीत परिणाम होतात तसेच विद्यार्थ्यांनी यापासून दूर राहून प्रचंड मेहनत करून यश संपादन करून चांगलं कार्य करावे असे सांगितले. अमली पदार्थाचे सेवन करू नये यासाठी अमली पदार्थ सेवन करणार नाही शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. योगेश चगदळे यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.अश्विनी जाधव, प्रा. नागरे ,प्रा. जायभाये, प्रा. धांडे, प्रा. पवार, प्रा. सातपुते, प्रा.राजपूत,प्रा. सोळंकी, प्रा.देशमुख, बद्री काळे गबाजी लाड ,संजय लाड , संतोष अंतरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.