माणिकगड हापर बंद ३रा दिवस तोडगा नाही आदिवासी आंदोलन सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी येथील आदिवासी जमीन विवाद गेल्या बारा वर्षापासून सुरू असून आठ महिन्यापासून कुसुंबी येथे आदिवासी कुटुंब ठिय्या आंदोलन करून संघर्ष करीत आहे याबाबत अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या नेतृत्वात राजुरा येथे सभा संपन्न झाली मात्र या प्रश्नाचा तोडगा निघाला नसल्याने गेल्या तीन दिवसापासून महिला व पुरुष कुसुंबी येथील हापर मध्ये जाऊन बसल्यामुळे चुनखडी वाहतूक सह खाणीचे काम बंद पडले मात्र तोडगा निघत नसल्याने आंदोलन करण्याच्या भावना तीव्र झाल्याने तीन दिवसापासून काम बंद पडले आहे पोलीस प्रशासनाकडून आंदोलन करताना आंदोलन थांबण्याचा आग्रह करण्यात आला मात्र आंदोलनकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सभेमध्ये मागणी करण्यात आलेल्या विषयावर ठाम असून मोजा कुसुंबी लीज करारानुसार देण्यात आलेल्या493 हेक्टर जमिनीची भूमापन मोजणी करण्यात यावी.
मोजा नोकरी येथील 30 हेक्टर जमीन लीज करार नसतानाकंपनीने थेट खरेदी करून वाणिज्य वापराच्या नावावर त्या ठिकाणी निवासी गाडे व इतर अनाधिकृत नगर रचना विभागाची मंजुरी नसताना बांधकाम केले याबाबतची ग्रामपंचायतची एनओसी देखील घेण्यात आलेली नाही व येथील तेरा आदिवासींच्या जमिनी सिलिंग अंतर्गत असल्याचे दाखवून खरेदी विक्री व्यवहार हाताळण्यात आले याबाबतची खरेदी आदिवासींच्या जमिनी थेट कंपनीच्या नावाने सातबारा मध्ये नोंद करण्यात आले मात्र लीज नसताना कंपनीने ही जमीन खरेदी केली व यामध्ये मोठा घोळ असून यापूर्वी बॉम्बे जरी येथील सर्वे नंबर 44 45 46 47 48 या कोलामाच्या जमिनी कंपनीच्या हद्दीमध्येआले असून त्या जमिनीवर ओवर बर्डन तसेच अनधिकृत रस्ता तयार करून कंपनीने ताबा केला आहे याबाबत ताब्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली मात्र ती जमीन अजूनही कोलामांच्या ताब्यात देण्यात आल्याने यामुळे आंदोलन करते आपल्या तिन्ही मागण्यावर ठाम असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केल्या जात आहे आकारबंधानुसार कुसुंबी येथील 174 हेक्टर जमीन तफावत असून त्या जमिनी गेल्या कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे या संपूर्ण बाबीचा निपटारा व्हावा यासाठी आंदोलनातनेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसचिव आबिद अली यांनीअनेक निवेदन तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित आहे मात्र यावर प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे आता आदिवासींच्या तीव्र भावना लक्षात घेता एकही आदिवासी कोलामांना कंपनीने गेल्या 40 वर्षात एकही जमीन धारकाला नोकरी दिली नाही त्यामुळे आम्हाला नोकरी द्या जमिनीची संयुक्त मोजणी करा व झालेल्या नुकसानीचा मोबदला द्या यासाठी आंदोलन सुरू असून तीन दिवसापासून सुरू असलेले पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलेला नाही याबाबत आदिवासी कार्यकर्त्यांनी कंपनी व प्रशासन तातडीने निर्णय घेऊन आदिवासींचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी अरुण उद्दे महादेव कुळमेथे गणेश सिडाम भीमा पगु मडावी च्यासह आंदोलनामध्ये बसलेले सर्व महिला पुरुषांनी केली आहे गोंडवानागणतंत्र पार्टीचे गजानन जुमनाके प्राध्यापक मंगाम आदिम कोलाम क्रांतिवीर श्यामा दादा संघटनेचे शंकर सिडाम गडचंदुर येथील शरद जोगी प्रीतम सातपुते इत्यादींनी भेट देऊन आंदोलन कर्त्याच्या भावना जाणून घेतल्या व सहकार्य करण्यासाठी तुम्हाला पाठींबा आंदोलनात सहभागा घेऊ असे भेट देऊन भावना व्यक्त केल्या यामुळे हा आंदोलन तिव्र रूप धारणा करण्याची चर्चा होत आहे.