अल्ट्राटेक विरुद्धचे आंदोलन स्थगित.
अल्ट्राटेक सिमेंट गेट, नांदा (फाटा)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
मागील बेचाळीस वर्षांपासून पालगांव वासीयांचा हक्काच्या रस्त्याकरता सुरू असलेला संघर्ष दि. २३ ते २५ जून पर्यंतच्या ठिय्या आंदोलनाच्या यशस्वी स्थगीतीने काल थांबला. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुजोर प्रशासनाने ग्रामस्थांपुढे नमते घेत अखेर येत्या दि. ३० सप्टेंबरपर्यंत पालगांवकडे जाणारा मुख्य रस्ता आणि कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्याची लेखी हमी दिली आहे.
या आंदोलनास पुर्ण शक्तीनिशी पाठिंबा जाहीर करून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आंदोलनस्थळी तिन्ही दिवस पुर्णवेळ हजर राहून खोटारड्या व फसव्या अल्ट्राटेकला खडेबोल सुनावले. म्हणतात ना ‘गाव करी ते राव न करी’ अगदी त्याचप्रमाणे गावाच्या एकजुटीपुढे निगरगट्ट अल्ट्राटेक प्रशासनाने आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या व सरपंच अरूण रागीट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे व पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या समवेत चर्चा केली. चर्चेअंती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पालगांवकडे जाणारा मुख्य रस्ता बनवून देण्यात येईल. तसेच कामगारांच्याही न्याय्य मागण्या निकाली काढू असे लेखी आश्वासन दिले.
त्यामुळे सदर ठिय्या आंदोलनास आता स्थगिती देण्यात आली आहे. परंतु अल्ट्राटेकने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने संबंधित कार्यवाही सुरू करावी अशी सुचना याप्रसंगी मी आवर्जून केली.
यावेळी माझ्यासमवेत भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, सरपंच अरूण रागीट, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, अमोल आसेकर, अरूण डोहे, आशिष ताजने, पुरुषोत्तम भोंगळे, दत्ता राठोड, सुरेश रागीट, बाळनाथ वडस्कर, विजयालक्ष्मी डोहे, संजय नित, प्रमोद कोडापे, अशोक झाडे, दिनेश ढेंगळे, निखिल भोंगळे, रमेश चुदरी, ओम पवार, हितेश चव्हाण, प्रमोद पायघन, सतीश जमदाडे, रवी बंडीवार, विशाल अहिरकर, सचिन आस्वले, पवन यादव, रोहन काकडे, दिपक वरभे, प्रफुल घोटेकर, सचिन भोयर, प्रदिप मोरे, शितल धोटे, उमा कंठाळे, नमिता विश्वास आदिंसह पालगांववासी आंदोलनकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.