ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माणूसपणाची उंची वाढविणारा थोर राजा राजर्षी शाहू महाराज – रवींद्र मुप्पावार
विश्वशांती विद्यालयात राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमावर
राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात जे कायदे,नियम केले,आदेश काढले हे पाहिल्यानंतर हा राजा माणूसपणाची उंची वाढविणारा होता हेच अधोरेखित होते. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा प्रसार करणे आवश्यक मानले.त्यांनी मुलामुलींसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुरू केले.
तसेच विविध जातीधर्माच्या मुलामुलींना वसतिगृहे स्थापन केली जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी सोईस्कर वातावरण मिळावे असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी व्यक्त केले.