ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.नंदू गुद्देवार

येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव पालखी सोहळा उत्साहात दिनांक 16 व 17 ला संपन्न झाला यानिमित्त विविध स्पर्धा गोंधळ किल्ले व शस्त्र प्रदर्शन वारकरी कीर्तन पालखी सोहळा ला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला

जयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी भवानी माता मंदिर ते शेष मंदिर पर्यंत पालखी सोहळ्यात ढोल ताशा पथक वारकरी भजन अश्व लेझीम पथक शिवाजी महाराजांच्या वेषातील मावळे पालखीत विराजमान शिवप्रतिमा पारंपारिक वेशभूषेतील महिला मंगल वेषातील तरुण व आतिषबाजी यामुळे चौका चौकात पालखी सोहळा बघण्यात प्रचंड गर्दी झाली

शेष मंदिर परिसरात पालखी सोहळा पोहोचल्यावर महाआरती होऊन खामगाव येथील शिवकथाकार शिवाजी महाराज झामरे यांचे शिवजन्मोत्सवावर ओजस्वी वाणीतील बहारदार वारकरी कीर्तन झाले

राष्ट्र ज्ञान स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचा विजेत्यांना या सोहळ्यात गौरविण्यात आले

भवानी माता मंदिरात दिनांक 16 ला झालेल्या गोंधळात अंबाबाईचा गजर करण्यासाठी ब्रह्मपुरी शहरातील विविध भजन मंडळ यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले

शिवरायांचे आरमार या विषयावर आधारित किल्ले व शस्त्र प्रदर्शनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये