विश्वशांतीची स्वाती झरकर विज्ञान विभागात तर प्रविणा आडेपवार कला विभागात तालुक्यातून प्रथम
विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली ची कुमारी स्वाती रमेश झरकर हिने४८० (८०.००%) गुण मिळवून विज्ञान विभागात तालुक्यातून प्रथम कु. प्रवीना रवींद्र आडेपवार हिने ५११(८५.१७%) गुण मिळवून कला विभागात तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर रेहाणी प्रवीण कोहळे ४६४(७७.३३%)गुण मिळवून विज्ञान विभागात दुसरा क्रमांक तर चिरंजीवी पुंडलिक चौधरी ४४६(७४.३३%) तिसरा क्रमांक पटकाविला आहे.तर कला विभागात कु. शितल शालिक गुरनुले हिने ४८६(८१.००%) गुण मिळवून तालुक्यातून दुसरा तर कुमारी अक्षया अतुल मांदाळे हिने ४८३ (८०.५०%) गुण मिळवित तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात आले.
वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक ओंकार श्रीकृष्ण राऊत ४७१(७८.५०%),द्वितीय क्रमांक कपिल किशोर कंकलवार ४१० (६८.३४%) तृतीय क्रमांक कुमारी डिंपल मनोज चौधरी ३८३ (६३.८३%)
एचएससीव्हीसी विभागात इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक अतुल चिंतामण मडावी ४११(६८.५०%)
हॉर्टिकल्चर विभागात प्रथम क्रमांक सानिया अरुण रामटेके ४२९(७१.५०%)तर क्रॉप सायन्स विभागात प्रथम क्रमांक हिमांशी राजू दडमल ३५१(५८.३४%) गुण मिळवित बहुमान मिळविला. गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तथा सदस्य विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.