पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक बैल ठार तर दुसरा गंभीर जखमी
हत्तींनाला शेतशिवरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चिमूर :- चिमूर तालुक्यातील वडसी -गोडमोहाडी मधोमध असलेल्या हत्तींनाला शेत शिवारात मोठया पट्टेदार वाघाने शेतात चारण्यासाठी बांधलेल्या दोन बैलावर २४ मार्चला दुपारच्या सुमारास हल्ला करून एकाला जागेवरच ठार केले. तर दुसऱ्याला गंभीर जखमी करीत नरडीचा घोट घेतला यामुळे दुसराही बैल मरण्याच्या वाटेवर आहे. यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले आहे . शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिमूर तालुक्यातील खातोडा येथील शेतकरी वामन गायकवाड हे शेतातील गहू कापनीसाठी सकाळी शेतात गहू कापणीसाठी स्वतःचे बैल घेऊन गेले असता शेतात चरण्यासाठी बैल बाधून गहू कापायला लागले. काही वेळानंतर जेवण करण्यासाठी बसले. त्यांना जेवण झाल्यानंतर बांधीतून बाहेर आले. मोठा पट्टेदार वाघ त्यांना नाल्यात जाताना दिसला. तेव्हा त्यांनी बैलाकडे पाहिले असता बैल पडून दिसले जवळ जाऊन पाहिले. एक बैल ठार झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत दिसला. त्यामुळे शेतकरी वामन गायकवाड यांनी आरडाओरडा केला त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी व मजुरवर्ग धावून आले.
पट्टेदार वाघ आणि वाघीण या परीसरात नेहमी धुमाकूळ घालत आहे.हत्तीनाला जवळ बफर झोन परीसर लागुन असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ या परीसरात फिरत असतात.
अनेक वेळा वृत्त पत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.या परीसरात अनेक शेतकऱ्यांचे बैलं पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहे हे विशेष.
शेतकऱ्यांला तात्काळ नुकसान भरपाई वनविागाने द्यावी आणि वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.