ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस मुख्यालय वर्धा येथे “वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024-25”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 28/08/2024 ते दिनांक 30/08/2024 वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू आहे. सदर क्रीडा स्पर्धेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभाग, आर्वी विभाग हिंगणघाट विभाग, पुलगाव विभाग व पोलीस मुख्यालय, वर्धा या संघांनी भाग घेतलेला आहे. सदर क्रीडा स्पर्धा पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शन सुरू असून सदर क्रीडा स्पर्धे दरम्यान क्रीडा दिवसाचे औचित्य साधून हॉकी चे जादुगर मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, गेम इन्चार्ज राजू उमरे, हॉकीचे खेळाडू आरिफ खान, जावेद शेख, हमिद शेख शेखर डोंगरे, दिनेश बोथकर, श्रीकांत खडसे, संदीप मेंढे, गणेश राऊत, अंकुश रामटेके, चंदू सोनोने, प्रमोद पिसे, अमोल जिंदे, मेहर बागडे, निलेश फाळके व इतर खेळाडू उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये