गुरुदेव सेवा मंडळाच्या संस्कार शिबिराचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा जिवती च्या वतीने १४ दिवसाचे संस्कार शिबीर शासकीय आश्रम शाळा जिवती येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये जीवती आणि कोरपना तालुक्यातील विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय होती.दिवसेंदिवस मुलांची जीवनशैली बदलत चालली असून अनेक विध्यार्थी हे व्यसनाच्या आहारी जात आहेत तसेच टीव्ही आणि मोबाईल मुळे तर मैदानी खेळापासून कोसो दूर गेलेली आहेत.
अशा सर्व परिस्थिवर गुरुदेव सेवा मंडळाचे संस्कार शिबीर हेच एकमेव आशेचे किरण असल्याचे अनेक पालकांनी बोलून दाखविले. संस्कार शिबिराची दिनचर्या पहाटे ४ वाजता सुरु होऊन सायं ७ वाजता संपत होती.पहाटे उठल्यानंतर प्रातविधी आटोपून स्नान, योग, व्यायाम,मलखांब, नामस्मरण त्यानंतर महापुरुषांचे जीवनचरित्र, संतांचे अभंग, कीर्तन, तुकडोजी महाराजांचे भजन, देशभक्ती चे विचार, बुद्धिमत्ता कौशल्य, आरोग्यविषयक माहिती, सर्वधर्मसमभावाची शिकवण असे उपक्रम तर दुपारच्या सत्रात मैदानी सांघिक खेळ, तसेच वैक्तिक खेळ,वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पाठांतर, भजन,कीर्तन स्पर्धा दररोज होत होते. सध्याच्या काळात मुले सतत मोबाईल आणि टीव्ही ला चिपकलेले असतात, अशावेळी १४ दिवस विध्यार्थ्यांना टीव्ही किंवा मोबाईल चे साधे दर्शन सुद्धा झाले नाही. त्यामुळे संस्कार शिबीरात जे विध्यार्थी सहभागी झाले होते ते चांगले विध्यार्थी, चांगले युवा आणि देशाचे उत्कृष्ट नागरिक होतील असा विश्वास शिबिराचे मुख्य संयोजक सुरेश चौधरी महाराज, तालुका सेवाधिकारी डॉ अंकुश गोतावळे, मुख्य संघटक आनंद कदम यांनी व्यक्त केला.
शिबिरातील विध्यार्थ्यांसाठी जिवती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी स्वेच्छेने अन्नदान केले. तसेच जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील अनेक लोकांनी शिबिराला भेटी दिल्या तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या जिल्ह्याच्या तसेच विभागीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी भेटी देऊन आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.संपूर्ण १४ दिवस विध्यार्थ्यांना राकेश चौधरी,जयपाल राठोड, धीरज राठोड, ख़ुशी गोखरे, गेडाम महाराज यांनी विध्यार्थ्यांना स्वावलंबन, व्यायाम, संगीत, गायन, लाठीकाठी, कराटे, मलखांब याचे प्रशिक्षण दिले.तर सुरेखा वाघमारे, लक्ष्मी सिडाम आणि कर्नूबाई कोडापे यांनी विधार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी पाडली.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अंकुश गोतावळे उपनराध्यक्ष नप जिवती, उदघाट्क प्रा.डॉ पांडुरंग सावंत सर, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य यु व्ही राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. व्ही व्ही वावरे,गोहोकार महाराज, मारोती जमदाडे, अनिल चौधरी, मोहनदास मेश्राम शामराव गेडाम, गेडाम महाराज, नारायण कणसे, किसनराव गेडाम, गुरुनाथ एकलारे, शिवाजी नैताम,शेषेराव बावळे, जळबा महाराज कांबळे, यामिनी मोरे,मांडवकर मॅडम, अधीक्षक कडू हे उपस्थित होते.
जयश्री गोतावळे नगरसेविका जिवती यांनी यांनी संस्कार शिबिरात सेवा देणारे शिक्षक, स्वयंपाकी आणि मुख्य संयोजक यांचा शाल आणि पुषगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कदम यांनी, प्रास्ताविक चौधरी महाराज यांनी तर आभार प्रदर्शन रवी कांबळे यांनी केले.