ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालडोह शाळेत मुलामुलींना कराटे व सेल्फ डिफेन्सचे धडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत काही शाळा विविध शिबिर घेऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे तर काही शाळा बंद असून मुलं मोकळी फिरत आहेत.अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह येथे नियमित शाळा सुरू असून त्यात विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक,बौद्धिक तथा कलात्मक विकास साधला जात आहे.नवोदय सारखे विषयाची तयारी मुलांकडून करून घेतली जात आहे. त्यातच मुलांना कराटे व सेल्फ डिफेन्स सारख्या विषयाचे धडे मुलांना दिले जात आहे. कुंदन पेंदोर जे डब्बल ब्लॅक बेल्ट असून ते कराटे प्रशिक्षण वर्ग चालवता त्यांनी नॅशनल गोल्ड मेडल व इंटर नॅशनल स्तरावर पदक मिळवले आहे. त्यांनी या शाळेत येऊन मुलांना कराटे व सेल्फ डिफेन्स विषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.

     *या एकदिवसीय कार्यशाळेसाठी हजर झाल्यामुळे इयत्ता 10 वी च्या मुलींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुध्दा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. शाळेतील मुली व मुलांना घेऊन बचाव कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात दीव्यंका बाजगीर,वैष्णवी इंडले, सोहम वाघमारे,शिवम सोडणर,सूरज कणकावरे या मुलांनी यात सहभाग घेतला.

इयत्ता १ ली ते इयत्ता १० पर्यंतच्या मुलामुलींनी यात आपला सहभाग घेतला. या प्रशिक्षण वर्गाला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी हजर राहून कुंदन पेंदोर यांचे आभार मानले.*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये