बांबेझरी येथे बचत गटातील महिलांचा बांबू प्रशिक्षण ला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगढ सिमेंट वर्क्स,सी.एस आर अंतर्गत बांबेझरी या गावातील महिला बचत गटातील महिलांना बांबूपासून विविध गृहोपयोगी शोभेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी महिलांना समाजात महत्वाचे स्थान मिळावे,या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनून आपल्या कुटुंबाचा आधार बनल्या पाहिजे या उद्देशातून हे प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण सतत 8 दिवस देण्यात आले. या 8 दिवसाच्या काळात महिलांनी विविध वस्तू बनविल्या. उदाहरणात – फुलांची कुंडी, फुलदाणी, फळदानी, चम्मच,फोटो फ्रेम इत्यादी वस्तू बनविणे शिकल्या. हे प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय राजू राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दिनांक 6 जुन रोजी या प्रशिक्षणाचा समापन करण्यात आला. समापन करण्या करिता गावातील सरपंच सौ. मनीषा पेंदोर यांची उपस्थिती होती.
मनीषा पेंदोर यांनी बचत गटातील महिलांना महिलांना प्रोत्साहन दिले.सर्व गावकर्यांनी,बचत गटातील महिलांनी, सरपंच ताई मनीषा पेंदोर यांनी अल्ट्राटेक कंपनी सी.एस आर टीम चे धन्यवाद मानले.