ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 ग्रामीण कृषी कार्यानुभव विद्यार्थी प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास ग्रामीण कृषी कार्यानुभव या अभ्यासक्रमात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाची सांगता ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. राजपूत व कीटकशास्त्राचे प्रा.चगदळे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक प्रा.चगदळे यांनी केले. यावेळी उद्घाटन पर मार्गदर्शनात डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना रावेचे सर्व विषयाचे कार्यक्रम व प्रात्यक्षिक योग्य पद्धतीने खेड्यामध्ये पार पाडावे असे सांगितले.

     ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये करावयाची कामे तसेच विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची भूमिका कशा पद्धतीने पार पाडावी व खेड्यामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचे कार्य करावे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय कृषी विद्यापीठाने तयार केलेले विविध वाण व विविध यंत्र याबद्दल सविस्तर माहिती दिली. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करून आगामी खरीप हंगामात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकरिता कार्यशाळा प्रात्यक्षिक व कृषी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करावे असा संदेश दिला.

        कार्यक्रमास महाविद्यालयाचे रा.से.यो. अधिकारी अश्विनी जाधव ,प्रा.सातपुते,प्रा.धांडे, प्रा. सानप ,प्रा. नागरे प्रा. जायभाये , प्रा. सोळंकी ,प्रा. पवार प्रा. देशमुख, प्रा. इंगळे,प्रा. म्हस्के,प्रा.शेळके प्रा. कव्हर, प्रा. वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात तसेच खरीप हंगामामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद,नवी दिल्ली व कृषी विद्यापीठ अकोला याचे कमी खर्चाचे शाश्वत तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे असे आव्हान केले.यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्षा नंदाताई कायंदे , सचिव सतीश कायंदे, प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये