घोराडच्या पंढरी वारीला, काँग्रेसच्या आरोग्य कक्षाची साथ…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज वर्धा जिल्हा काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष व होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर वारीसाठी निघालेल्या श्री. संत केजाजी महाराज सेलू घोराड येथील पालखी ह.भ.प. महाकाळकर महाराज व त्यांच्यासोबत इतर सर्व जाणाऱ्या १०० पेक्षा जास्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री हनुमान मंदिर, सालोड (हिरापूर), वर्धा येथे मुक्कामी असताना सायंकाळी 8:00 वाजता पासून डॉ. अभ्युदय मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती.
आज पहिला दिवस असल्या मुळे वारकऱ्यांची तपासणी खूप आवश्यक होती असे प्रतिपादन ह भ प महाकाळकर महाराजानी विशेष आभार मानताना केले.
हे शिबीर यशस्वी करण्या करिता होमिओपॅथी असोसिएशन चे डॉ. रवी देशमुख डॉक्टर कुंभारे, डॉक्टर जुई मेघे, डॉक्टर निमकर, डॉक्टर सुचित्रा कुर्वे, डॉक्टर ऋषिकेश ठाकरे, डॉक्टर धोटे, आणि काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षेचे अमित देशमुख (संचालक कृ.उ.बा.स.), श्रीकांत धोटे, अक्षय हजारे, अभी देशमुख, सोहम, नानाजी झाडे, पांडूभाऊ झाडे, प्रदीप रोडे, पवन राठोड, अंकुश मुंजेवार मनीष तेलरांधे, सुरेश रोकडे, मनोज वाढाईत व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.